चार
सकाळी सकाळी आम्ही आधी आमची नवीन चूल पेटवली. ती पेटवता पेटवता काही कल्पना सुचल्या. लगेच मनोहरच्या कानावर घालून टाकल्या. मग स्वैपाक करून टाकला. देशी मटका फ्रीजचा उत्तम वापर होत होता. सर्व भाज्या आणि दूध छान ताजे रहात होते. स्वैपाक म्हणजे पोळी, भाजी, आमटी एव्हढाच होता. आमटी पण इन्स्टन्ट होती. म्हणजे डाळीऐवजी फुटाण्याची डाळ किंवा डाळं वापरून केली होती. मनोहरला सांगितल्यावरच कळलं. मग एकत्र बसून परत सगळी योजना कागदावर मांडून घेतली. अग्रक्रम ठरवला.
पहिलं म्हणजे बाथरूम. दुसरं वॉशिंग मशीन. तीन टपरीचे छप्पर. चार झाडं लावणे. पाच घरांचा आराखडा करणे. सहा सूर्य-वायू ऊर्जा स्रोत (म्हणजे आपलं सोलर विंड हायब्रीड हो) उभा करणे. या सर्वांमागे काही तत्व. उर्जेच्या बाबतीत शक्य तो आपली वस्ती पूर्णपणे स्वयंपूर्ण असावी. पेट्रोल, डीझेल, रॉकेल आणि गॅस शक्य तो नाहीच वापरायचा. कारण ही ऊर्जा केव्हा ना केव्हा संपणार आहे. भाज्या-फळे ही आवारातच पिकवायची. धान्य, तेल-तूप मात्र बाहेरून आणायचे. आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक लोकांच्या सहभागाने हा प्रकल्प उभारायचा.
मनोहर आणि आमच्या गटातल्या काही वात्रट मंडळीनी या प्रकल्पाला “उद्योगी वृद्धाश्रम” असं नाव दिला आहे. म्हणजे निवृत्त झाले तरी ज्यांना अजूनही काही तरी उद्योग करायची हौस आहे, त्यांचा हा आश्रम !
बाथरूमची सोय कशी करावी यावर मनोहरकडे भरपूर कल्पना होत्या. बहुधा मिलिटरी कँपमधल्या अनुभवामुळे असाव्या. त्यामुळे आता हा प्रोजेक्ट तो बघणार हे नक्कीच होतं. माझ्या काही अपेक्षा म्हणजे त्यात कपडे बदलण्यासाठी एक वेगळी खोली हवी, आणि गरम पाण्यासाठी काही तरी नवी कल्पना हवी, एव्हढं सांगून टाकलं.
पुढचे दोन दिवस आम्ही पेपर वर्क करीत होतो. वॉशिंग मशीन करायचं म्हणजे फक्त मानवी शक्तीवर चालणारं मशीन. वीज नको. जरा अवघड आव्हान होतं. पण अशक्य नक्कीच नव्हतं. उद्देश सरळ होता. सोलर-विंड ची वीज जरी मिळाली नाही तरी रोजची कामं ही सहज झालीच पाहिजे. कल्पना काढणे मला सहज जमत होतं. पण अंमलात कोण आणणार? बऱ्याच कल्पना अगदी अवास्तव होत्या. पण मनोहर त्या कल्पनांना वास्तवात आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत होता. आणि इंटरनेटमुळे तर अनेक कल्पना अगदी रेडीमेड मिळत होत्या, अगदी उपकरणांच्या प्रात्यक्षिकासकट ! काही ठिकाणी तर ही उपकरणे कशी करावी याचे पण मार्गदर्शन मिळत होते.
आमच्या गटातली सगळी जण आमचं काय चाललंय ते बघायला फार उत्सुक होती. या सर्व कल्पना त्यांच्यासमोर ठेवून त्यांची संमती आणि पैसे मिळवणे यांची गरजही होती. आमचे कागदी आराखडे थोडेफार तयार होते. मग आम्ही सर्वांना फोनवरून बोलावणे धाडले. या आठवड्याशेवटी तिघं-चोघं येणार असं ठरलं. म्हणजे आता या लोकांची पण व्यवस्था बघायला हवी. महादुला हाक मारली. करडे पाटलांची मदत लागणार होती. ३-४ जण येणार महणजे त्यांची जेवणं, झोपायची व्यवस्था हे बघावा लागणार होतं. जमिनीचा करार केला तेव्हा सगळे एकदा येऊन गेलेच होते. पण आता मुक्काम करणार होते.
करडे पाटलांची एकदा सविस्तर भेट घेतली. सगळा प्लॅन समजून सांगितला. ते नुसते माना डोलावत होते. आणि मधेच हासत होते. त्याना हे सगळं मजेशीर वाटत असावे. स्पष्टच विचारले तेव्हा “ह्ये लई भारी चाललंय. खेड्यातल्या लोकांना शहरात जायची घाई, आणि शहरातल्या लोकांना खेड्याची ओढ.” असं म्हणून खो खो हसत सुटले. पण शहरातल्या प्रमाणे इथे सिनेमा नाही, मॉल नाही, गाण्या-बजावण्याचे कार्यक्रम नाहीत, हे मात्र त्यांनी बजावले. सुदैवाने डिश टीव्हीमुळे करमणुकीचा प्रश्न नव्हता. आणि इंटरनेटवर आता सुपरमॉल असतो. शहरात ज्येष्ठ नागरिकांचे काय प्रश्न असतात ते खेड्यातल्या लोकांना समजणं अवघड असतं. सामुहिक जीवन जगण्यात कसा वेळ जातो आणि कसं छान वाटतं, ते आम्हाला माहीत होतं. पण हे सगळं आता प्रत्यक्षत येईल तेव्हा खरं.
जेव्हा ते एकदाचे सकाळीच आले तेव्हा गाडीतून दिलीप, सुरेश, सुभाष उतरलेच पण त्यांच्या बरोबर विजया पण उतरली, आणि आम्ही पहातच राहिलो. ही कशी आली? “अरे, काल रात्री अचानक ठरलं. मग लगेच दिलीपला कळवलं आणि आले. म्हटलं तुम्हाला सरप्राईझ देऊ या.” ‘माझे आई, इथे जेमतेम अडचणीत ३-४ पुरुषांची सोय होऊ शकते. आता तुझी काय व्यवस्था करू?’ हे सगळं मनातल्या मनात. मुख्य महणजे आम्ही विहिरीवर आंघोळ करत होतो. हिच्या अंघोळीचं काय करायचं? विजया म्हणजे आमच्या एका दिवंगत मित्राची, राजारामची बायको. एकदम झणझणीत स्वभावाची, स्पष्टवक्ती आणि बाणेदार, पण दिलदार. आल्या आल्या तिने ताबा घ्यायला सुरुवात केलीच, शंभर प्रश्न विचारून. बाई पाहून महादूची बायको तर आलीच पण करडे पाटलांच्या वाड्यावरचा निरोपही घेऊन आली. ती वाड्यावर गेल्यावर मग सगळ्यांना तोंड फुटले.
आमचा झकास चहा होईपर्यंत विजया आणि तिच्याबरोबर पाटलीण बाई आणि दोन-तीन तरुण बायका पण येतांना दिसल्या. त्यांची आणि आमची तशी समोरासमोर पहिलीच भेट होती. त्या बायकांनी आमच्यासाठी गरम शिरा आणला. वर कुरडया आणि पापड सुद्धा. विजयाने आग्रहाने त्याना बसवून घेतले, सगळ्यांची ओळख करून दिली. हळू हळू त्या मग बोलायला लागल्या. आमची झोपडी आणि टॉयलेट यांची भेट, सैर आणि तपासणी झाली. आमच्या शेगडीची भरपूर चेष्टा झाली. विजयाने मग स्वैपाकाचा ताबा घेतला आणि आम्ही इकडे आमची गप्पांची मैफल सजवायला सुरुवात केली. विजयाच्या बडबड्या आणि उत्साही स्वभावाने तिने सगळ्या करडे- पाटील खानदानाला आपलंसं केलंच होतं.
दुपारी जेवण मात्र झक्कास झाले. आमच्या शेगडीची टिंगल न होता चांगलीच स्तुती चालली होती. मनोहरला एकदम स्फुरण चढले. आमच्या शेगडीचे पुढचे सर्व प्रयोग त्याने रंगवून सांगितले. समस्त स्त्री वर्ग प्रभावित झाल्याचे पाहून मनोहरपंत एकदम खुश जाहले. नाही म्हणायला एका चाणाक्ष गृहिणीने “बघू बघू” असा चेहरा केला होता, ते अस्मादिकांच्या नजरेतून सुटले नाही.
जेवणं झाल्यावर मग आमची मीटिंग सुरु झाली. सुरेश म्हणजे महा-चिकित्सक. आणि कंजूस. त्याच्या प्रश्नांना उत्तरे देता देता मनोहर एकदम भडकला. दिलीप तसा एकदम समंजस आणि समतोल विचारी मनुष्य. त्याने जरा सांभाळून घेतले. विजयाला कधी नव्हे ते सगळा आराखडा खूप आवडला होता. पण तिने केलेल्या एका सूचनेने रण माजले. लोकांचा सहभाग कसा घ्यावा अशी चर्चा होती. आणि तिची सुचना होती, एक मंदिर बांधायची. विजया तशी धार्मिक वगैरे नव्हती. पण हे तिला कसं सुचलं कोण जाणे. आमच्यापैकी सुभाष सोडला तर कोणी भाविक नव्हते. पण सर्वांच्या वयाचा व गावकऱ्यांचा विचार केला तर मंदीर होणे गरज होती. पण पैसे कोण देणार?
इतका वेळ गप्प असलेला सुभाष एकदम उभा राहिला. “मंदिरासाठी माझी पहिली देणगी, १० लाख रु.” आमच्या या निसर्ग प्रकल्पाच्या वर्गणीव्यतिरिक्त ही देणगी म्हणजे मोठीच गोष्ट. मंदीर आमच्यासाठी तर फायद्याचे होतेच, पण शिवाय तेथील स्थानिकांना पण त्याचा उपयोग होणार होते. तसे गावात एक मारुती आणि एक महादेवाचे मंदिर होते. मग आम्ही गणपती मंदिर स्थापन करायचे ठरवले. आणि मग प्रत्येकालाच उत्साह आला. जमिनीचे नकाशे काढले आणि मंदिराची जागा ठरवण्यात सगळे मग्न झाले. परत विजयानेच सूचना केली कि जागा, दिशा हे सगळं ठरवतांना गावकऱ्यांना सहभागी करणे जरुरी आहे.
मी लगेच करडे पाटलांना शोधून काढून मिटिंग मध्ये घेऊन आलो. आणि मग काय रंग चढला म्हणता. करडे पाटील तर खुश झालेच. लगेच त्यांनी चार गावकरी, सरपंच यांना बोलावणे धाडले. पुढची बोलणी, रात्रीचे जेवण आणि विजयाची झोपायची सोय या सगळ्यांची जबाबदारी पाटलांकडे आपोआप आली. पण गावकऱ्यांशी या निमित्ताने जरा दोस्ती झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पण बदलले. त्यांना आमच्या प्रयोगात रस निर्माण झाला. रात्री जातांना तरी एकाने विचारलेच, ‘हे निसर्ग निसर्ग काय हाये तुमचं? आम्हाला शेहेराची वढ आणिक तुमाला हि खेड्याची आस. आपल्याला तर काई समजेना ब्वा.’
दुसरा दिवस परत चर्चा-बैठका या मधेच गेला. पण मंडळी संध्याकाळी परत जाईपर्यंत बऱ्याच गोष्टी पक्क्या झाल्या होत्या. संध्याकाळी मग त्यांच्याच बरोबर मी आणि मनोहर देखील शहराकडे रवाना झालो. पहिला टप्पा अंदाज घेणे, ग्रामीण जीवनाची चव बघणे, काही आराखडे करणे यासाठी होता, आणि तो व्यवस्थित पार पडला होता. येतांना गाडीत मी आणि मनोहरने सगळे अनुभव तिखट मीठ लावून सांगितले आणि एकमेकांची टिंगल करीत शेवटी एका ब्रेक साठी घरी परतलो. आता बाकी सब ब्रेक के बाद.

No comments:
Post a Comment